
‘हाउसिंग फॉर ऑल’ योजनेतील आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
कोलकाता, 17 जून (हिं.स.) : पश्चिम बंगालमधील माजीमंत्री उदयन गुहा यांना पोलिसांनी अटक केली आहे. उदयन गुहा यांना कोलकात्यातील फुलबागान परिसरातील त्यांच्या निवासस्थानातून दिनहाटा पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘हाउसिंग फॉर ऑल’ योजनेअंतर्गत नागरिकांना घरे मिळवून देण्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे वसूल केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उदयन गुहा यांच्यावर निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात सहभाग, धमकी देणे तसेच भ्रष्टाचारासह इतर अनेक गंभीर आरोपही आहेत. त्यांना आज, बुधवारी दिनहाटा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. ‘हाउसिंग फॉर ऑल’ योजनेअंतर्गत दिनहाटातील बायिंदादा परिसरातील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली नगरपालिकेकडून प्रत्येकी 20 हजार रुपये अतिरिक्त वसूल करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या वेळी उदयन गुहा हे नगरपालिकेचे अध्यक्ष होते.दिनहाटा पोलीस ठाण्याच्या सूत्रांनुसार, सकाळी पोलिसांचे विशेष पथक कोलकात्यात पोहोचले आणि फुलबागान परिसरातून उदयन गुहा यांना अटक केली. दिनहाटा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभूत झाल्यानंतर ते कोलकात्यात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसले नव्हते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी