पंतप्रधान मोदींची मेलोनी यांच्याशी भेट; मेलोडी ट्रेंड पुन्हा चर्चेत
नवी दिल्ली , 17 जून (हिं.स.) फ्रान्समधील एव्हियन-ले-बॅं येथे यावर्षीच्या जी-7 शिखर परिषदेसाठी जगभरातील अनेक नेते एकत्र आले होते. येथे विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, अधिकृत बैठका आणि धोरणात्मक चर्चांपेक्षा एका खास क्षणाने सर्वांचे लक्ष
पंतप्रधान मोदींची मेलोनी यांच्याशी भेट; मेलोडी ट्रेंड पुन्हा चर्चेत


नवी दिल्ली , 17 जून (हिं.स.) फ्रान्समधील एव्हियन-ले-बॅं येथे यावर्षीच्या जी-7 शिखर परिषदेसाठी जगभरातील अनेक नेते एकत्र आले होते. येथे विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, अधिकृत बैठका आणि धोरणात्मक चर्चांपेक्षा एका खास क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पुन्हा एकदा हलक्याफुलक्या गप्पा रंगल्या. या संवादाची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

परिषदेच्या पारंपरिक समूह छायाचित्रासाठी सर्व नेते एकत्र येत असताना मेलोनी आणि मोदी यांनी एकमेकांचे मनापासून स्वागत केले. संवाद जरी थोडक्यात झाला, तरी त्यामध्ये नेहमीप्रमाणेच आपुलकी दिसून आली. यावेळी मेलोनी यांनी मोदींना सांगितले, “तुम्हाला पुन्हा भेटून आनंद झाला.” त्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला. त्यावर मेलोनी मिश्कीलपणे म्हणाल्या, “होय, आपण इंस्टाग्रामवर सर्वात जास्त लोकप्रिय आहोत.”

‘मेलोडी’ हा शब्द मोदी आणि मेलोनी या दोघांच्या आडनावांपासून तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला हा शब्द विनोद आणि मैत्रीपूर्ण संवादातून समोर आला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांत तो सोशल मीडियावरील एक लोकप्रिय ट्रेंड बनला आहे. 2023 मध्ये दुबई येथे झालेल्या सीओपी-28 (COP28) परिषदेदरम्यान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतची एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते, “ सीओपी-28 मध्ये माझा चांगला मित्र ‘मेलोडी’.” या पोस्टनंतर #Melodi हा हॅशटॅग प्रचंड लोकप्रिय झाला. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी यावर मीम्स, फॅन एडिट्स आणि अनेक मजेदार पोस्ट तयार केल्या. तेव्हापासून मोदी आणि मेलोनी यांची जवळपास प्रत्येक भेट इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. जी-7 परिषद असो, आंतरराष्ट्रीय शिखर परिषद असो किंवा द्विपक्षीय बैठक, #Melodi हा हॅशटॅग वारंवार ट्रेंड होताना दिसतो.

गेल्या महिन्यात रोम दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांना ‘मेलोडी’ टॉफ्यांचे एक पाकीट भेट दिले होते. ‘मेलोडी’ ट्रेंडवर मोदी यांनी दिलेली ही आतापर्यंतची सर्वात गोड प्रतिक्रिया मानली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande