रायपूर विमानतळावर मोठा अपघात टळला ; एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक
रायपूर, 17 जून (हिं.स.)रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर दिल्लीहून रायपूरला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकला. विमान उतरत असताना ही पक्षी धडक बसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. यात कोणतीही जीवितहा
एअर इंडिया विमानाचा संग्रहित फोटो


रायपूर, 17 जून (हिं.स.)रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर दिल्लीहून रायपूरला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकला. विमान उतरत असताना ही पक्षी धडक बसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

एअर इंडियाचे विमान सकाळी ८:१५ वाजता रायपूरला पोहोचणार होते. सकाळी ८:०८ च्या सुमारास विमान रायपूर विमानतळावर उतरले, तेव्हा ही पक्षी धडक बसली. पक्षी धडकल्याची माहिती मिळताच, विमानतळ आणि एअरलाइन व्यवस्थापनाने सुरक्षा नियमांनुसार विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू केली.

नियोजित वेळेनुसार, हेच विमान सकाळी ८:५५ वाजता रायपूरहून दिल्लीसाठी निघणार होते, परंतु तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा मंजुरी मिळेपर्यंत उड्डाणास विलंब झाला. सुमारे अडीच तास चाललेल्या तपासणीनंतर, विमान उड्डाणासाठी योग्य असल्याचे घोषित करण्यात आले.

एअर इंडियाचे विमान सकाळी सुमारे ११:३५ वाजता रायपूरहून दिल्लीसाठी निघाले. या विलंबामुळे कामकाजावर परिणाम झाला आणि प्रवाशांना नियोजित वेळेपेक्षा खूप जास्त वेळ थांबावे लागले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande