रोहित शर्माची ऐतिहासिक कामगिरी; लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४,००० धावांचा टप्पा पार
लखनऊ, 17 जून, (हिं.स.) - भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण केल्या. सामना सुरू होण्यापूर्वी, हा टप्पा गाठण्यासाठी त्य
रोहित शर्मा


लखनऊ, 17 जून, (हिं.स.) - भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण केल्या. सामना सुरू होण्यापूर्वी, हा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ १० धावांची गरज होती, ज्या त्याने मैदानावर येताच सहजपणे पूर्ण केल्या. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ११,६४० धावा केल्या आहेत.

रोहित शर्माची एकूण लिस्ट ए क्रिकेट आकडेवारी पाहणे हे कोणत्याही फलंदाजासाठी एक स्वप्न आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण ३५७ सामने खेळले असून, ३४५ डावांमध्ये ४६ पेक्षा जास्त प्रभावी सरासरीने १४,०३८ धावा केल्या आहेत. या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासात, रोहितने ३७ उत्कृष्ट शतके आणि ७४ अर्धशतके झळकावली आहेत. जे त्याचे सातत्य आणि दीर्घ खेळी खेळण्याची क्षमता स्पष्टपणे दर्शवते.

रोहित शर्माने या ऐतिहासिक खेळीदरम्यान अत्यंत आक्रमक फलंदाजी केली. त्याने अफगाण गोलंदाजांवक जोरदार हल्ला चढवला आणि ४८ धावांची वेगवान खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने सहा चौकार आणि दोन उत्तुंग षटकारही मारले. मात्र, अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर रशीद खानच्या फिरकी चेंडूवर आपली विकेट गमावल्याने रोहित शर्मा अर्धशतकापासून वंचित राहिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande