हिमाचल प्रदेश : बोलेरो दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू
चंबा, १८ जून (हिं.स.) : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील पुखरी उपविभागांतर्गत चंबा-मसरूंड मार्गावर छतरूंडजवळ बुधवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बोलेरो (एचपी-01सी-2581) ही ग्रामपंचायत कुठेड़च्या मह
अपघात लोगो


चंबा, १८ जून (हिं.स.) : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील पुखरी उपविभागांतर्गत चंबा-मसरूंड मार्गावर छतरूंडजवळ बुधवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बोलेरो (एचपी-01सी-2581) ही ग्रामपंचायत कुठेड़च्या महल गावातील असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका अन्य व्यक्तीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महल गावातील नागरिक पंचायतच्या काकड़ोथा गावात आयोजित मुंडन संस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर सर्वजण बोलेरो वाहनातून आपल्या घरी परतत होते. त्याचवेळी छतरूंडजवळ वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो खोल दरीत कोसळली.हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जणाने नंतर उपचारादरम्यान प्राण गमावले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील नागरिक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची मदत केली. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदत व बचावकार्याला गती दिली.स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी रस्ते सुरक्षा उपाययोजनांच्या अभावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, रस्त्याच्या कडेला क्रॅश बॅरिअर नसल्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली. पुरेशा सुरक्षा व्यवस्था असत्या तर हा मोठा अपघात टाळता आला असता, असा आरोपही त्यांनी केला.

चंबाचे पोलीस अधीक्षक विजय कुमार सकलानी यांनी सांगितले की, छतरूंडजवळ बोलेरो वाहन दरीत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलीस आणि स्थानिक प्रशासन बचावकार्यामध्ये गुंतले होते. मृत आणि जखमींबाबतची माहिती गोळा केली जात असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणातील प्रत्येक पैलूची सखोल चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाकडून मृतांची ओळख पटविणे, शवविच्छेदन आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अपघातप्रवण रस्त्यांवर सुरक्षा उपाय अधिक बळकट करण्याची मागणी केली आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande