अफगाणिस्तानमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी
काबुल , 18 जून (हिं.स.)।अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने असा एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तेथील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला आहे. तालिबानचा प्रमुख आणि देशाचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदझादा यांच्या आदेशानंतर सरकार
अफगाणिस्तानमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी


काबुल , 18 जून (हिं.स.)।अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने असा एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तेथील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला आहे. तालिबानचा प्रमुख आणि देशाचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदझादा यांच्या आदेशानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आपले स्मार्टफोन बंद करावे लागत आहेत. जर कोणी स्मार्टफोन वापरताना आढळले, तर त्यांची नोकरी जाऊ शकते, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि काही भागांत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिक्षक, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी चिंतेत आहेत, कारण त्यांचे अनेक काम व्हॉट्सअॅप, ई-मेल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांच्या मदतीने होत होते.

वृत्तानुसार, अफगाणिस्तानातील विविध भागांतील सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले स्मार्टफोन बंद करण्यास सुरुवात केली आहे. हा आदेश बुधवारी लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्मार्टफोनवर बंदी घालणारा तालिबानी आदेश गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर प्रसारित होत होता. या पत्रावर अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे चिन्ह होते.पत्रात म्हटले होते, “सर्व प्रांतांतील विभागप्रमुखांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना, मग ते वरिष्ठ असोत किंवा कनिष्ठ, १७ जूनपासून स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बंद असल्याची माहिती द्यावी.” हा आदेश लष्करी तसेच नागरी विभागांतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. यात असेही नमूद करण्यात आले आहे की, केवळ सर्वोच्च नेत्याच्या परवानगीनेच या नियमातून सूट दिली जाऊ शकते.

या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या दुर्गम बदख्शान प्रांतातील माहिती विभागातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. बदख्शानमधील तीन सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे त्यांच्यासाठी दैनंदिन कामकाज करणे अधिक कठीण होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande