
पंकज त्रिपाठी आणि कन्या आशी झळकले विशेष चित्रफितीत
मुंबई, 18 जून (हिं.स.) : फादर्स डेच्या निमित्ताने डी बीअर्स ग्रुपने आपल्या ‘लव्ह, फ्रॉम डॅड’ या विशेष मोहिमेला अधिक भावनिक आणि वैयक्तिक स्वरूप देत प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी आणि त्यांची कन्या आशी यांच्यासोबत एक हृदयस्पर्शी चित्रफीत सादर केली आहे. वडील आणि मुलीमधील विश्वास, प्रोत्साहन तसेच निःस्वार्थ प्रेमाचे नाते या मोहिमेत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
या मोहिमेचा मुख्य केंद्रबिंदू मुलीच्या आयुष्यातील ‘सेकंड इअर पिअर्सिंग’ अर्थात दुसरे कान टोचण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. परंपरेपलीकडे जाऊन स्वतःच्या आवडीची निवड करण्याचा आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचा हा क्षण नैसर्गिक हिऱ्याच्या माध्यमातून प्रतीकात्मक स्वरूपात सादर करण्यात आला आहे.समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रफितीत वडिलांना आपल्या मुलीच्या आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी प्रवासाची जाणीव होत असल्याचा भावनिक क्षण टिपण्यात आला आहे. या माध्यमातून वडील-मुलीच्या नात्यातील जिव्हाळा आणि भावनिक बंध अधोरेखित करण्यात आले आहेत.
फादर्स डे सप्ताहांतानिमित्त डी बीअर्स ग्रुपतर्फे देशभरातील 50 निवडक स्टोअर्समध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पुणे, लखनौ आणि नागपूरसह विविध शहरांतील ग्राहकांना 20 आणि 21 जून रोजी वडील आणि मुलींना एकत्रितपणे अविस्मरणीय आठवणी जपण्याची संधी मिळणार आहे.या उपक्रमांतर्गत नामांकित छायाचित्रकारांच्या उपस्थितीत विशेष छायाचित्रण सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून, ग्राहकांना आपल्या नात्याच्या सुंदर आठवणी कायमस्वरूपी जतन करता येणार आहेत. फादर्स डे निमित्त तयार करण्यात आलेली ही विशेष चित्रफीत डी बीअर्स ग्रुपच्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात येणार असून, आयुष्यातील अविस्मरणीय क्षण साजरे करण्याचा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात येत आहे.
डी बीअर्स इंडिया यांच्या कॅटेगरी मार्केटिंग प्रमुख तोरंज मेहता म्हणाल्या, “नैसर्गिक हिरे हे आयुष्यातील अत्यंत खास क्षणांचे प्रतीक राहिले आहेत. मुलीच्या स्वातंत्र्याचा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘सेकंड पिअर्सिंग’ला आम्ही या मोहिमेद्वारे विशेष महत्त्व देत आहोत. पंकज त्रिपाठी आणि आशी यांच्या माध्यमातून आम्ही या नात्याची दुर्मीळता आणि अस्सलपणा साजरा करत आहोत.
या सहकार्याबाबत भावना व्यक्त करताना पंकज त्रिपाठी म्हणाले की, पालक म्हणून आपल्या मुलांनी स्वतःचे निर्णय घेण्यास सुरुवात केल्याचे पाहणे हा अत्यंत भावनिक अनुभव असतो. दुसरे कान टोचणे हा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याचा क्षण आहे. माझी मुलगी आशीसोबत ही मोहीम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत खास ठरला. नैसर्गिक हिऱ्याप्रमाणेच वडिलांचे प्रेमही काळाच्या प्रत्येक टप्प्यावर तितकेच शाश्वत राहते.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis