पाटोद्यात दोन सख्ख्या भावांची घरे फोडली; अडीच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास
बीड, 18 जून (हिं.स.)। पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे दोन सख्ख्या भावांच्या घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण २,६६,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या
पाटोद्यात दोन सख्ख्या भावांची घरे फोडली; अडीच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास


बीड, 18 जून (हिं.स.)। पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे दोन सख्ख्या भावांच्या घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण २,६६,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोमरी येथील रहिवासी आपल्या कुटुंबासह घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या आणि शेजारी राहणारे त्यांचे भाऊ यांच्या घराच्या खोलीचे कंडे तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे गंठण, अंगठ्या, लहान मुलांचे झुंबर, चांदीच्या साखळ्या, दोन मोबाईल आणि ९५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक संभाजी तागड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande