भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन पहिल्या मोहिमेसाठी सज्ज; १४ जुलै रोजी करणार प्रक्षेपण
नवी दिल्ली , 18 जून (हिं.स.)। भारतीय वंशाचे चिकित्सक आणि नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आपल्या आयुष्यातील पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) सुमारे आठ महिने, म्हणजेच २४० दिवस वास्तव्यास राहणार आहेत. ही
भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन पहिल्या मोहिमेसाठी सज्ज; १४ जुलै रोजी करणार प्रक्षेपण


नवी दिल्ली , 18 जून (हिं.स.)। भारतीय वंशाचे चिकित्सक आणि नासाचे अंतराळवीर अनिल मेनन आपल्या आयुष्यातील पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) सुमारे आठ महिने, म्हणजेच २४० दिवस वास्तव्यास राहणार आहेत. ही मोहीम मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी कझाकस्तानमधील बायकोनूर कॉसमोड्रोम येथून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

अनिल मेनन आणि त्यांचे सहकारी २०२७ च्या वसंत ऋतूपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहतील. या काळात ते अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग करणार असून, भविष्यात चंद्र आणि मंगळावर मानवी मोहिमा पाठवण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे. अंतराळातील हा प्रवास अनिल मेनन एकटे करत नसून, आयएसएसवरील मोहिमा नेहमी आंतरराष्ट्रीय पथकाच्या स्वरूपात राबवल्या जातात. या मोहिमेत ते रशियन अंतराळवीर प्योत्र दुब्रोव्ह आणि अन्ना किकिना यांच्यासह अंतराळात रवाना होणार आहेत.

२४० दिवसांच्या या मोहिमेदरम्यान तिन्ही अंतराळवीर विविध वैज्ञानिक संशोधन आणि प्रयोगांमध्ये सहभागी होणार आहेत. नासाच्या माहितीनुसार, अनिल मेनन यांचे प्रमुख कार्य म्हणजे अंतराळातील वातावरण आणि शून्य गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत मानवी शरीर स्वतःला कसे जुळवून घेते, याचा अभ्यास करणे. अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस येथे जन्मलेल्या अनिल मेनन यांचे आई-वडील भारतीय आणि युक्रेनियन वंशाचे स्थलांतरित आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande