
नवी दिल्ली, 18 जून (हिं.स.) -
गेल्या 12 वर्षात विकास आणि सांस्कृतिक वारसा या दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन देण्यात मोदी सरकारने केलेल्या कामगिरीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज प्रकाश टाकला.
'एक्स' (X) वरील पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले, मोदी सरकारची 12 वर्षे विकास आणि वारसा यांचा संगम असलेले सुवर्ण युग ठरले आहे. या 12 वर्षात एकीकडे श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैन महाकालाचे बांधकाम झाले, तर दुसरीकडे पीएम आवास योजना, आयुष्मान भारत, अन्न भंडार, जागतिक दर्जाची संपर्क व्यवस्था, पायाभूत सुविधा, मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांनी देशाच्या विकासाच्या प्रवासाला अभूतपूर्व गती दिली आहे.
एक कोटी अभिलेखांचे डिजिटलायझेशन करून, 668 प्राचीन कलाकृती भारतात परत आणून, 11 आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयांची स्थापनाआणि 11 भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देऊन, पंतप्रधान मोदी यांनी हे दाखवून दिले आहे की, विकास आणि वारसा, हे एकमेकांना पूरक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी