नीरज चोप्रा बऱ्याच कालावधीनंतर दोहा डायमंड लीग २०२६ मध्ये पुनरागमन करणार
नवी दिल्ली, 18 जून (हिं.स.)भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नीरज चोप्रा मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी, अधिकृतपणे जाहीर करण्यात आले की नीरज चोप्रा १९ जून र
नीरज चोप्रा


नवी दिल्ली, 18 जून (हिं.स.)भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नीरज चोप्रा मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी, अधिकृतपणे जाहीर करण्यात आले की नीरज चोप्रा १९ जून रोजी प्रतिष्ठित दोहा डायमंड लीगमध्ये सहभागी होणार आहे. या घोषणेमुळे त्याच्या स्पर्धांच्या वेळापत्रकाविषयी आणि या हंगामातील पुनरागमनाविषयी सुरू असलेल्या अनेक आठवड्यांच्या चर्चांना आणि उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे.

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा काही काळापासून पाठीच्या दुखापतीशी झुंज देत होता आणि त्यातून सावरत होता. या दुखापतीमुळे त्याला या वर्षात आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेत किंवा क्रीडा प्रकारात भाग घेता आला नव्हता. हंगामाच्या सुरुवातीला त्याची अनुपस्थिती भारतीय चाहत्यांसाठी चिंतेचे कारण होती, परंतु त्याच्या पुनरागमनाच्या बातमीने मोठा दिलासा मिळाला आहे.

नीरज चोप्राची व्यवस्थापन कंपनी, वेल स्पोर्ट्सने, आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या पुनरागमनाची बातमी शेअर केली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, २०२६ चा पहिला भालाफेक दोहामध्ये! नीरज चोप्रा १९ जून रोजी स्पर्धेत पुनरागमन करेल. त्यानंतर लगेचच, नीरज चोप्राने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर, दोहामध्ये भेटूया, असे थोडक्यात आणि स्पष्ट शब्दांत लिहून या बातमीला दुजोरा दिला.

या मोठ्या स्पर्धेसाठी नीरज चोप्राच्या नावाचा समावेश उशिरा झाला. खरे तर, १२ जून रोजी आयोजकांनी जाहीर केलेल्या अधिकृत यादीत सुरुवातीला नीरज चोप्राच्या नावाचा समावेश नव्हता. मात्र, पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याच्या प्रवेशाला पुष्टी मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande