निवेक विमेन्स लीग बॅडमिंटन स्पर्धा : नॉकआऊट वॉरियर्स विजयी तर फेव्हर्स फ्युरिज उपविजयी
नाशिक, 18 जून (हिं.स.)। निवेकच्या बॅडमिंटन कोर्टवर २ ऱ्या निवेक विमेन्स बॅडमिंटन लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नॉकआउट वॉरियर्स संघाने अंतिम लढतीत फेव्हर्स फ्युरिज संघावर विजय मिळवत विजेतेपद मिळविले. राऊंड रॉबिन पद्दतीने खेळल्या
निवेक विमेन्स लीग बॅडमिंटन स्पर्धा : नॉकआऊट वॉरियर्स विजयी तर फेव्हर्स फ्युरिज उपविजयी


नाशिक, 18 जून (हिं.स.)। निवेकच्या बॅडमिंटन कोर्टवर २ ऱ्या निवेक विमेन्स बॅडमिंटन लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नॉकआउट वॉरियर्स संघाने अंतिम लढतीत फेव्हर्स फ्युरिज संघावर विजय मिळवत विजेतेपद मिळविले. राऊंड रॉबिन पद्दतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत सर्व सामने दुहेरी प्रकारात खेळविले गेले.

चुरशीच्या खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत २-२ अश्या बरोबरीनंतर नॉकआउट वॉरियर्सच्या जोडीने आपापसात चांगला समन्वय साधत हा निर्णायक सेट २१- १७ असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नांवे केले. या स्पर्धेत चार संघांनी सहभाग नोंदवला प्रत्येक संघामध्ये १६ वर्षे वयोगटापासून ते ६१ वर्षे वयोगटांच्या खेळाडूंचा समावेश होता. विजेत्या संघातील खेळाडूंना नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष शर्मिला कुलकर्णी, नितीन धात्रक, नितीन वागस्कर, गौरव धारकर आणि राष्ट्रीय खेळाडू तथा जिल्हा सचिव पराग एकांडे, अमित राजपूत यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत विजेत्या संघाचे प्रायोजक (मालक) मोहिनी भोलीया आणि हर्षदा एकांडे आणि उपविजेत्या संघाचे प्रायोजक पायल जैन आणि रश्मी चोपडे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रयोजकांमुळे या विविध वयोगटाच्या खेळाडूंना हे व्यासपीठ मिळत आहे यासाठी आयोजकांनी त्यांचे आभार मानले. या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी राधिका थत्ते, स्नेहल कोहोक, प्राजक्ता जाधव, हर्षदा एकांडे यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande