एआयच्या विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोनाचे पंतप्रधान मोदींकडून आवाहन
नवी दिल्ली, 18 जून (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियान येथे आयोजित G7 शिखर परिषदेत,“कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करणे” या विषयावरील सत्राला संबोधित केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही
pm modi g7 summit france


नवी दिल्ली, 18 जून (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियान येथे आयोजित G7 शिखर परिषदेत,“कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करणे” या विषयावरील सत्राला संबोधित केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी संस्कृतीची दिशा बदलण्याची क्षमता असलेली एक परिवर्तनकारी शक्ती असली तरी, तिने लोकांना सक्षमही केले पाहिजे,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. याच व्यापक विचाराने भारताने अलीकडेच 'एआय इम्पॅक्ट समिट'चे आयोजन केले होते,असे त्यांनी नमूद केले.एआयसाठी असलेल्या भारताच्या मानवकेंद्रित किंवा 'मानवी' दृष्टिकोनाला अधोरेखित करत त्यांनी सांगितले की हे तंत्रज्ञान सर्वसमावेशकता, सुरक्षा आणि सार्वजनिक हिताच्या तत्त्वांवर आधारित असले पाहिजे.

भारताने सायबर स्पेसला नेहमीच एक जागतिक कल्याणकारी सार्वजनिक मालमत्ता मानले आहे असे सांगत,लोकशाही देशांना अशा एआय मॉडेल्सचा वापर करता आला पाहिजे, जे त्यांच्या महत्त्वपूर्ण माहिती पायाभूत संरचनेला सुरक्षित ठेवू शकतील आणि त्यांना सायबर धोक्यांचा सामना करण्यास मदत करतील,यावर पंतप्रधानांनी जोर दिला.त्यांनी एआयच्या विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोनाचे आवाहन केले, ज्यामध्ये सुरक्षितता, वेग आणि कार्यक्षमता यांचा एकत्रितपणे विचार केला जाईल

या संदर्भात त्यांनी चार सूचना केल्या: एआय प्रणालीच्या रचना सुरक्षित असाव्यात; एआयच्या अंमलबजावणीसाठी समान मानके, चाचणी आराखडे आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वे असणे आवश्यक आहे; डीपफेक, चुकीची माहिती आणि सायबर फसवणूक यांचा सामना करण्यासाठी प्रभावी जागतिक सहकार्य असले पाहिजे; आणि एक सर्वसमावेशक जग सुनिश्चित करण्यासाठी एआयचे लाभ 'ग्लोबल साउथ'मधील देशांपर्यंत पोहोचले पाहिजेत.

एआयने मानवी क्षमतांची शक्ती वाढवली पाहिजे, मानवी निवडीला सक्षम केले पाहिजे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण केले पाहिजे,तसेच, या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी भारत आपल्या भागीदारांसोबत काम करत राहील,असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande