पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह; पतीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा
रायगड, 18 जून (हिं.स.)।अलिबाग : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केल्याप्रकरणी तसेच कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
Second marriage while the first wife is alive; case registered against the husband at Alibaug Police Station.


रायगड, 18 जून (हिं.स.)।अलिबाग : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केल्याप्रकरणी तसेच कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी या म्हसळा तालुक्यातील कन्या शाळेजवळ राहतात. आरोपी हा मूळचा कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील चिकना गावचा रहिवासी आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने अनेक वेळा दारूच्या नशेत फिर्यादीला शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच मारहाण करून जिवे ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या.

याशिवाय, आरोपीने सन 2023 मध्ये कायदेशीर घटस्फोट न घेता विवाह नोंदणी कार्यालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप आहे. फिर्यादी पत्नी हयात असताना आणि तिची संमती नसताना आरोपीने दुसरा विवाह केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे फिर्यादीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगण्यात आले.तक्रारीची दखल घेत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 90/2026 अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 498(अ) (वैवाहिक छळ), 494 (द्विविवाह), 323 (मारहाण), 504 (शिवीगाळ) आणि 506 (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande