पंतप्रधान मोदींकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना कलमकारी महाभारत, ब्रिजिट मॅक्रॉन यांना पोचमपल्ली स्टोल भेट
नवी दिल्ली , 19 जून (हिं.स.)।फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांना भारताच्या समृद्ध कला आणि हस्तकला परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या विशेष भेटवस्तू प्रदान केल
पंतप्रधान मोदींकडून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना कलमकारी महाभारत, ब्रिजिट मॅक्रॉन यांना पोचमपल्ली स्टोल भेट


नवी दिल्ली , 19 जून (हिं.स.)।फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांना भारताच्या समृद्ध कला आणि हस्तकला परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या विशेष भेटवस्तू प्रदान केल्या. या भेटवस्तूंच्या माध्यमातून भारताचा सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कौशल्य आणि शिल्पकलेचे जागतिक स्तरावर दर्शन घडवण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध हस्तनिर्मित कलमकारी शैलीतील महाभारतावरील चित्रकला भेट दिली. हे कलाकृती तयार करण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. पारंपरिक कलमकारी शैलीत साकारलेल्या या चित्रामध्ये महाभारतातील विविध प्रसंगांचे चित्रण करण्यात आले असून, धर्म, न्याय, शौर्य आणि नैतिक निर्णय यांसारख्या शाश्वत मूल्यांचे दर्शन घडते.

या चित्रातील मुख्य आकर्षण म्हणजे भगवद्गीतेतील तो प्रसंग, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्तव्य, आत्मसंयम आणि अंतर्गत शक्तीचा मार्ग दाखवतात. ही कलाकृती केवळ एका ऐतिहासिक महाकाव्याचे चित्रण नसून नैतिक नेतृत्व, शांतता, ज्ञान आणि मानवी प्रतिष्ठा यांसारख्या सार्वत्रिक मूल्यांचे प्रतीक मानली जाते, जी आजही संपूर्ण जगासाठी तितकीच महत्त्वाची आहेत.

दरम्यान, राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांना पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील प्रसिद्ध पोचमपल्ली सिल्क स्टोल भेट म्हणून दिला. हाताने विणलेला हा रेशमी स्टोल पारंपरिक ‘इकत’ रंगाई तंत्राने तयार केला जातो. आकर्षक भौमितिक आणि पुष्पीय नक्षी, उत्कृष्ट कारागिरी आणि मोहक पोत यासाठी हा स्टोल प्रसिद्ध आहे.

भारतीय परंपरा आणि आधुनिक कलात्मकतेचा सुंदर संगम असलेला हा स्टोल भारताच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे प्रतीक मानला जातो. फॅशन, कला आणि उत्कृष्ट हस्तकलेबद्दल फ्रान्सची असलेली विशेष आवड लक्षात घेता, ही भेट भारत-फ्रान्स सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणारी मानली जात आहे.

पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांदरम्यान जागतिक नेत्यांना भारताच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरांचे प्रतीक असलेल्या वस्तू भेट देतात, जेणेकरून या वस्तूंना जागतिक स्तरावर ओळख मिळावी आणि भारताच्या ऐतिहासिक वारशाची अधिकाधिक लोकांना माहिती व्हावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande