फर्निचर व्यावसायिकाकडे ३ लाखांची खंडणी; मुलचेराचा वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षकासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात
गडचिरोली, 19 जून (हिं.स.) एका खाजगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाकडून वनविभागाच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह (RFO), वनरक्षक आणि एका खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केल
फर्निचर व्यावसायिकाकडे ३ लाखांची खंडणी; मुलचेराचा वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षकासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, 19 जून (हिं.स.)

एका खाजगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाकडून वनविभागाच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह (RFO), वनरक्षक आणि एका खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खाजगी इसमाला एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू (RFO), वनरक्षक नितेश मडावी आणि खाजगी मध्यस्थ प्रदीप मंडल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

कारवाईची भीती दाखवून मागितली ३ लाखांची खंडणी

मिळालेल्या माहितीनुसार, मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात हा संपूर्ण प्रकार घडला. येथील एका खाजगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाला वनविभागाकडून कारवाई करण्याची भीती दाखवण्यात आली होती. ही कारवाई टाळण्यासाठी आणि व्यवसायात अडचण निर्माण न करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि त्यांचा खाजगी हस्तक प्रदीप मंडल यांनी तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

एसीबीचा सापळा अन् खाजगी इसम रंगेहात जेरबंद

तक्रारदार व्यावसायिकाची लाच किंवा खंडणी देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रंगेहात तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तात्काळ तक्रारीची पडताळणी केली असता, खंडणी मागितल्याची बाब स्पष्ट झाली.त्यानुसार, खंडणीचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये देण्याचे ठरले. एसीबीने मुलचेरा परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना खाजगी इसम प्रदीप मंडल याला एसीबीच्या पथकाने रंगेहात दबोचले.

दोन्ही वनअधिकारी तपासाच्या चक्रात

खाजगी इसम प्रदीप मंडल याला रंगेहात पकडल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू आणि वनरक्षक नितेश मडावी यांची भूमिका उघड झाली आहे. एसीबीने या दोन्ही अधिकाऱ्यांना तपासाच्या चक्रात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शासकीय पदाचा गैरवापर करून खाजगी इसमाच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या या रॅकेटचा एसीबीने पर्दाफाश केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

पहिला हप्ता ५० हजार रुपये स्वीकारताना खाजगी इसमाला रंगेहात पकडले; गडचिरोली वनविभागात मोठी खळबळ

मुलचेरा (गडचिरोली):एका खाजगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाकडून वनविभागाच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह (RFO), वनरक्षक आणि एका खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खाजगी इसमाला एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू (RFO), वनरक्षक नितेश मडावी आणि खाजगी मध्यस्थ प्रदीप मंडल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

कारवाईची भीती दाखवून मागितली ३ लाखांची खंडणी

मिळालेल्या माहितीनुसार, मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात हा संपूर्ण प्रकार घडला. येथील एका खाजगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाला वनविभागाकडून कारवाई करण्याची भीती दाखवण्यात आली होती. ही कारवाई टाळण्यासाठी आणि व्यवसायात अडचण निर्माण न करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि त्यांचा खाजगी हस्तक प्रदीप मंडल यांनी तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

एसीबीचा सापळा अन् खाजगी इसम रंगेहात जेरबंद

तक्रारदार व्यावसायिकाची लाच किंवा खंडणी देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रंगेहात तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तात्काळ तक्रारीची पडताळणी केली असता, खंडणी मागितल्याची बाब स्पष्ट झाली.त्यानुसार, खंडणीचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये देण्याचे ठरले. एसीबीने मुलचेरा परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना खाजगी इसम प्रदीप मंडल याला एसीबीच्या पथकाने रंगेहात दबोचले.

दोन्ही वनअधिकारी तपासाच्या चक्रात

खाजगी इसम प्रदीप मंडल याला रंगेहात पकडल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू आणि वनरक्षक नितेश मडावी यांची भूमिका उघड झाली आहे. एसीबीने या दोन्ही अधिकाऱ्यांना तपासाच्या चक्रात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शासकीय पदाचा गैरवापर करून खाजगी इसमाच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या या रॅकेटचा एसीबीने पर्दाफाश केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond

 rajesh pande