पंतप्रधान शनिवारी 'पीएम-किसान'च्या 23 व्या हप्त्याची मोठी भेट देणार : मंत्री शिवराज सिंह चौहान
* पश्चिम बंगालमध्ये कार्यक्रमाचे आयोजन * देशभरातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सुमारे 18,880 कोटी रुपये थेट जमा होणार नवी दिल्ली, 19 जून (हिं.स.) - केंद्र सरकारच्या ''विकसित भारत, विकसित पश्चिम बंगाल'' या संकल्पाला नवी गती देण
पंतप्रधान शनिवारी 'पीएम-किसान'च्या 23 व्या हप्त्याची मोठी भेट देणार : मंत्री शिवराज सिंह चौहान


* पश्चिम बंगालमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

* देशभरातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सुमारे 18,880 कोटी रुपये थेट जमा होणार

नवी दिल्ली, 19 जून (हिं.स.) - केंद्र सरकारच्या 'विकसित भारत, विकसित पश्चिम बंगाल' या संकल्पाला नवी गती देण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून रोजी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातून कृषी, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि रेल्वे यासह विविध क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. यावेळी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) चा 23 वा हप्ता जारी करतील, तसेच ते प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना, डिजिटल कृषी मिशन अंतर्गत अॅग्रीटेक, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आणि प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ करतील. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि समावेशक विकासाला मोठी चालना मिळेल, तसेच पश्चिम बंगालमधील कृषी क्षेत्राच्या परिप्रेक्ष्यात बदल घडेल, अशी आशा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये आयोजित होणारा हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम शेतकरी, ग्रामीण समाज आणि तरुणांसाठी ऐतिहासिक संधी ठरेल अशी आशा केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्व भारताला कृषी, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाचे एक सक्षम केंद्र बनवण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून, 20 जून रोजी होणारा कार्यक्रम या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.

कृषी आणि कृषक कल्याण क्षेत्रासाठी मोठी भेट

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून 'पीएम-किसान'चा 23 वा हप्ता जारी करतील, अशी माहिती चौहान यांनी दिली. या अंतर्गत, देशभरातील 9.44 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अंदाजे 18,880 कोटी रुपये हस्तांतरित केले जातील, यामुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची सुरक्षा बळकट होईल. याबरोबरच वर्ष 2019 मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून देशभरात झालेले एकूण वितरण 4.46 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande