संरक्षण मंत्री आणि अनंत अंबानीं एकाच दिवशी संघ मुख्यालयात
राजनाथ सिंह-भागवत यांच्यात प्रदीर्घ चर्चा,अंबांनीनी घेतली सदिच्छा भेट नागपूर, 19 जून (हिं.स.) : शासकीय कार्यक्रमासाठी नागपूर दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि खासगी कामासाठी नागपुरात आलेले उद्योगपती अनंत अंबानी यांनी आज, शुक्रवारी राष
प्रतिकात्मक छायाचित्र


राजनाथ सिंह-भागवत यांच्यात प्रदीर्घ चर्चा,अंबांनीनी घेतली सदिच्छा भेट

नागपूर, 19 जून (हिं.स.) : शासकीय कार्यक्रमासाठी नागपूर दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि खासगी कामासाठी नागपुरात आलेले उद्योगपती अनंत अंबानी यांनी आज, शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी या दोघांनीही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. अनंत अबांनीनी केवळ सदिच्छा भेट घेतली तर राजनाथ सिंह यांनी सरसंघचालकांशी तब्बल 45 मिनीटे संवाद साधला.

अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्ट्री परिसरात शुक्रवारी 10 हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे राजनाथ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमाराला राजनाथ सिंह थेट संघ मुख्यालयात पोहचले. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी तब्बल 45 मिनीटे चर्चा केली. चर्चेदरम्यान देशाच्या संरक्षण क्षेत्रातील प्रगती आणि जागतिक युद्धजन्य परिस्थीती आणि भारताची संरक्षण क्षेत्रातील तयारी याबाबत अनौपचारिक संवाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. संरक्षण मंत्र्यांची भेट आटोपल्यानंतर काही वेळाने तरुण उद्योगपती अनंत अंबानी देखील संघ मुख्यालयात पोहचले. एका स्थानिक नेत्याच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपूरला आलोल्या अनंत यांनी देखील सरसंघचालकांची सदिच्छा भेट घेतली. रिलायन्स उद्योग समूहाकडून सीएसआर अंतर्गत राबवले जाणारे उपक्रम, सामाजिक कामे आणि स्वदेशी व स्वावलंबन याबाबत केल्या जाणाऱ्या कामांची माहिती त्यांनी सरसंघचालकांना दिली. याभेटीनंतर अनंत अंबानी रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातही गेले. याठिकाणी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. अंबानी कुटुंबिय आणि संघ परिवाराचा जुना संबंध असून यापूर्वी अंबनी कुटुंबियांनी 2024 मध्ये अनंत अंबनीच्या लग्नात देखील सरसंघचालकांना बोलावले होते.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande