अहेरी नगरपंचायत पोटनिवडणुकीत ६१.५० टक्के मतदान
डचिरोली, 20 जून (हिं.स.) : अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीसाठी आज, 20 जून 2026 रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण 61.50 टक्के मतदान केले. भाजपच्या सुनीता मंथनवार यांच्या निधना
प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मतदानासाठी रांगेत मतदार


डचिरोली, 20 जून (हिं.स.) : अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ च्या पोटनिवडणुकीसाठी आज, 20 जून 2026 रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण 61.50 टक्के मतदान केले.

भाजपच्या सुनीता मंथनवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली. एकूण 393 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक राहिली.

पुरुष मतदार : 193

महिला मतदार : 200

एकूण मतदान : 393

मतदान टक्केवारी : 61.50 टक्के

या निवडणुकीत दुरंगी आणि चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपच्या माया शंकर येलुरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या संजना हनुमंतु मडावी यांचा समावेश आहे. दोन्ही पक्षांनी या प्रभागात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

मतमोजणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, प्रभागाचा नवा प्रतिनिधी कोण होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत गांगुर्डे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित सोनवाणे यांनी संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या हाताळली. मतदान शांततेत पार पडल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande