१० हजार रुपये नाकारल्याने कुऱ्हाडीने सपासप वार; तेलंगणातील व्यक्तीची गडचिरोलीत निर्घृण हत्या
गडचिरोली, 20 जून (हिं.स.) मरपल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करंचा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अवघे दहा हजार रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका ५५ वर्षीय इसमाने तेलंगणातील एका व्यक्तीची कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या क
१० हजार रुपये नाकारल्याने कुऱ्हाडीने सपासप वार; तेलंगणातील व्यक्तीची गडचिरोलीत निर्घृण हत्या


गडचिरोली, 20 जून (हिं.स.)

मरपल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करंचा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अवघे दहा हजार रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका ५५ वर्षीय इसमाने तेलंगणातील एका व्यक्तीची कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील रहिवासी असलेले महेश ओडेला हे येंकाबंडा येथे एका तेरवीचा कार्यक्रम आटोपून त्यांच्या परिचयाचे असलेले करंचा गावातील लक्ष्मण सोमा आलाम (वय ५५) यांच्या घरी आले होते. रात्री सर्व काही सुरळीत असताना, मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी लक्ष्मण आलाम याने महेश यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली. परंतु, महेश यांनी पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून आरोपी लक्ष्मण याने घरातील कुऱ्हाड काढून झोपेत असलेल्या महेश यांच्या डोक्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, महेश ओडेला यांचा जागीच मृत्यू झाला.

मरपल्ली पोलिसांत गुन्हा दाखल; तपास सुरू

या थरारक घटनेची माहिती मिळताच मरपल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी मरपल्ली पोलीस ठाण्यात आरोपी लक्ष्मण सोमा आलाम याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली मरपल्लीचे प्रभारी अधिकारी आकाश शिंदे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande