छत्रपती संभाजीनगर येथील अष्टविनायक बाल व त्वचा रुग्णालयाचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील अष्टविनायक बाल व त्वचा रुग्णालयाच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी उपस्थित राहून रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर येथील अष्टविनायक बाल व त्वचा रुग्णालयाच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी उपस्थित राहून रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाच्या विविध सुविधांची पाहणी केली. बालरोग व त्वचारोग क्षेत्रात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरणार आहे.

या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश शेळके, डॉ. पूजा शेळके व संपूर्ण शेळके परिवाराचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रुग्णसेवा आणि समाजसेवेचा हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी होवो, ही सदिच्छा.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande