अंमळनेर - गहिनीनाथ गड बस सेवा सुरू; सर्वसामान्यांसह विद्यार्थी आणि रुग्णांची सोय
बीड, 20 जून, (हिं.स.)। अंमळनेर परिसरातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बीड-अंमळनेर-गहिनीनाथ गड ही बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पूर्वी बीड आगारातून सुटून अंमळनेर येथे मुक्कामी असणारी ही बस सेव
अंमळनेर - गहिनीनाथ गड बस सेवा सुरू; सर्वसामान्यांसह विद्यार्थी आणि रुग्णांची सोय


बीड, 20 जून, (हिं.स.)। अंमळनेर परिसरातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बीड-अंमळनेर-गहिनीनाथ गड ही बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पूर्वी बीड आगारातून सुटून अंमळनेर येथे मुक्कामी असणारी ही बस सेवा मध्यंतरी अचानक बंद झाली होती. त्यामुळे अंमळनेर, पिंपळवंडी, भडकेल, पांढरवाडी फाटा, हातोला, कोतन या आदी परिसरातील नागरिकांना शासकीय कामासाठी तसेच विद्यार्थी, व्यावसायिक, रुग्ण यांना बीड येथे ये-जा करण्यासाठी एस.टी. परिवहन मंडळाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. तसेच, बीड येथून अंमळनेरच्या दिशेने दुपारी साडेतीन नंतर कोणत्याच प्रकारची सुविधा या मार्गावर उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकांना बीड येथेच मुक्काम करण्याची वेळ येत होती. मात्र, आता बीड आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता बस सुटून निरगुडी, डोंगरकिन्ही, अंमळनेरमार्गे श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे मुक्कामी बस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे बीडमधील भाविकांना श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊंच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

ही बस दुसऱ्या दिवशी गहिनीनाथ गड येथून सकाळी साडेसहा वाजता सुटून बीडच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याने अंमळनेर व आठेगाव पुड्डठ्ठा या भागातून बीडपर्यंत वाहतूक सोयीची झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande