बीडमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत आढावा बैठक
बीड, 20 जून (हि.स.) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे बीड जिल्हा वैद्यकीय अधिकारी तथा जिल्ह्याचे प्रमुख डॉ. चैतन्य कागदे यांनी आमदार सुरेश धस यांची अद्वैतचंद्र निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता
अ


बीड, 20 जून (हि.स.) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे बीड जिल्हा वैद्यकीय अधिकारी तथा जिल्ह्याचे प्रमुख डॉ. चैतन्य कागदे यांनी आमदार सुरेश धस यांची अद्वैतचंद्र निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत गरजू रुग्णांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी आवश्यक ती मदत वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून रुग्णांना तत्काळ मदत मिळावी आणि प्रक्रियेत सुलभता यावी यावर विशेष भर देण्यात आला. तसेच लाभार्थ्यांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुढील कार्यपद्धतीवरही विचारविनिमय करण्यात आला.

या प्रसंगी पाटोदा येथील स्वीय सहाय्यक सोमनाथ कोल्हे तसेच वैद्यकीय रुग्ण मदतीसंदर्भातील कामकाज पाहणारे अधिकृत सहाय्यक ॲड. महेश बेदरे उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande