नववीतील मुलीचा बालविवाह रोखला,दामिनी पथकाची ऐनवेळी कारवाई
छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)। घरजावयाच्या आशेने नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. जांभळा तांड्यावर लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. वधू-वर स्टेजवर उपस्थित असतानाच दामिनी पथकाने धडक देत बालविवाह
नववीतील मुलीचा बालविवाह रोखला,दामिनी पथकाची ऐनवेळी कारवाई


छत्रपती संभाजीनगर, 20 जून (हिं.स.)।

घरजावयाच्या आशेने नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. जांभळा तांड्यावर लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. वधू-वर स्टेजवर उपस्थित असतानाच दामिनी पथकाने धडक देत बालविवाह रोखला. संबंधित मुलगी नववीत शिकत असून तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून घराला आधार मिळावा या उद्देशाने पालकांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले. महिला व बालविकास समितीच्या सदस्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मुलीचे शिक्षण आणि बालपण वाचवले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande