शेतकऱ्यांच्या रस्त्यांचे प्रश्न तातडीने सोडवा – बीड जिल्हाधिकारी
बीड, 20 जून (हिं.स.)। बीड तहसील कार्यालयात आयोजित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महसूल प्रशासनाला शेतकरी व नागरिकाभिमुख कामकाजाचे स्पष्ट निर्देश दिले. शेतरस्ते हे शेतकऱ्यांच्या दैनंद
अ


बीड, 20 जून (हिं.स.)। बीड तहसील कार्यालयात आयोजित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महसूल प्रशासनाला शेतकरी व नागरिकाभिमुख कामकाजाचे स्पष्ट निर्देश दिले.

शेतरस्ते हे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि शेतीशी थेट संबंधित असल्याने अडविलेले व वादग्रस्त शेतरस्ते प्राधान्याने मोकळे करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण नागरिकांशी सौजन्यपूर्ण, संवेदनशील आणि सकारात्मक दृष्टिकोनातून वागण्याचे आवाहन केले.

बैठकीत महसूल वसुली, फेरफार प्रकरणे, ई-अभिलेख, नागरिक सेवा, संजय गांधी निराधार योजना, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी यासाठी महसूल यंत्रणेने अधिक उत्तरदायित्वाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांची पाहणी करून कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि परिणामकारक करण्याबाबत मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande