नाशिकमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम वेगात , अनधिकृत बांधकामे हटवली
नाशिक, 20 जून (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला वेग आला आहे. या कारवाईचे आमदार देवयानी फरांदे यांनी स्वागत करत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आभार मानले. प्
Commissioner congratulates


नाशिक, 20 जून (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला वेग आला आहे. या कारवाईचे आमदार देवयानी फरांदे यांनी स्वागत करत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आभार मानले.

प्रभाग क्रमांक 14 अंतर्गत सारडा सर्कल ते चौक मंडई या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे 20 जून 2026 रोजी हटविण्यात आली. या कारवाईत अनधिकृत शेड, दुकाने, टपऱ्या, बांधकामे तसेच भंगार दुकाने आणि साहित्य हटविण्यात आले.

तसेच प्रभाग क्रमांक 23 अंतर्गत पखाल रोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर 23 जून 2026 रोजी कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत अनधिकृत लॉन्स, मटन व चिकन दुकाने तसेच स्क्रॅप दुकाने यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले की, आगामी दोन महिन्यांत कोणतेही मोठे सण नसल्याने महापालिकेने इंदिरानगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, अशोका मार्ग, द्वारका परिसर यांसह प्रमुख भागांमध्ये व्यापक अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.

शहरातील रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

अतिक्रमण हटविल्यानंतर संबंधित ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित देखरेख ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मोकळ्या करण्यात आलेल्या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करून नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande