नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेणार – जिल्हाध्यक्ष
नाशिक, 20 जून (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, यांच्यासह पक्ष नेतृत्वाने माझ्
District President Dilip Khaire


नाशिक, 20 जून (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, यांच्यासह पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी ऋणी आहे. त्यांनी दाखविलेला विश्वास आपण सार्थ ठरवू. आगामी काळात नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेऊ असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर आज शनिवारी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथील कार्यालयात आज पदभार स्वीकारला. तसेच यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पदाधिकारी व कर्त्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक दिवसांनंतर राष्ट्रवादी भवन पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गजबजून गेले होते.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष खैरे म्हणाले की, “मला भाषणांपेक्षा संवाद अधिक महत्त्वाचा वाटतो. पक्षाच्या वाटचालीमध्ये काही काळ खंड पडला होता. मात्र आता थांबलेले काम अधिक वेगाने पुढे नेण्याचा निर्धार आम्ही केला आहे. येत्या आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक हालचाल दिसून येईल असे त्यांनी म्हटले. तसेच पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. अनेक कार्यकर्ते कोणत्याही अपेक्षेशिवाय पक्षासाठी झटत असतात. अशा प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचविणारा दुवा म्हणून मी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मी शब्द देतो, पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याच्या भावना आणि अपेक्षा वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीन. कार्यकर्त्यांनी कोणत्याही वेळी संपर्क साधला तरी त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध राहीन असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार आणि धोरणे अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांच्या विचारांना समोर ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नियोजनबद्ध दौरे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आठवड्यातील एक दिवस राष्ट्रवादी भवन येथे ‘जनता दरबार’ भरवून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande