अमरावती - ४९८ ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध; २५ जूनपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
अमरावती, 20 जून (हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील एकूण ४९८ ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे रीतसर मुनादी (दवं
४९८ ग्रामपंचायतींचे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध २५ जूनपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन


अमरावती, 20 जून (हिं.स.)

अमरावती जिल्ह्यातील एकूण ४९८ ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे रीतसर मुनादी (दवंडी) देऊन हे प्रारूप आरक्षण नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. या प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणामध्ये जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील ४४, वरूड ४३, दर्यापूर ४९, अंजनगाव सुर्जी ३४, अमरावती ४६, भातकुली ३६, नांदगाव खंडेश्वर ५१, चांदुर रेल्वे ३०, धामणगाव रेल्वे ५५, तिवसा ३०, मोर्शी ३९ आणि चांदुर बाजार तालुक्यातील ४१ अशा एकूण ४९८ ग्रामपंचायतींच्या तपशील समाविष्ट आहे. आरक्षणाचादरम्यान, हे प्रारूप आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या नागरिकांना यावर काही आक्षेप किंवा हरकती घ्यायच्या असतील, त्यांच्यासाठी २५ जून २०२६ ही अंतिम तारीख आहे.शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयात हे आक्षेप स्वीकारले जातील, विहित मुदतीत आपले आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande