१६ महिने डंपरचे भाडे न देता वाहनही गायब; तिघांविरोधात गुन्हा
रायगड, 20 जून (हिं.स.)। दिघी (सागरी) पोलीस ठाणे हद्दीत डंपर भाड्याने घेऊन तब्बल १६ महिने भाडे न देता वाहनही परत न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ फेब्र
Dumper rental unpaid for 16 months and vehicle missing; case registered against three individuals.


Dumper rental unpaid for 16 months and vehicle missing; case registered against three individuals.


रायगड, 20 जून (हिं.स.)। दिघी (सागरी) पोलीस ठाणे हद्दीत डंपर भाड्याने घेऊन तब्बल १६ महिने भाडे न देता वाहनही परत न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा प्रकार घडला. मौजे गोंडघर येथील एचपी पेट्रोलपंपासमोरील पार्किंगमध्ये आरोपी क्रमांक १ ते ३ यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांनी फिर्यादी यांच्या मालकीचा एमएच ४६ एफ ५५५७ क्रमांकाचा डंपर दरमहा १ लाख ८० हजार रुपये भाडे देण्याच्या तोंडी करारावर घेतला.

मात्र, करारानुसार डंपर वापरूनही आरोपींनी १६ महिने उलटून गेल्यानंतरही भाड्याची रक्कम दिली नाही. तसेच डंपरही परत केला नसल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने दिघी (सागरी) पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तक्रारीच्या आधारे गुन्हा क्रमांक ५६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२) आणि ३(५) तसेच BNS ४०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिक्कीत करीत असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande