एकल महिलांसाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण; सूचना आणि अभिप्रायांचे पाठविण्याचे आवाहन
नंदुरबार, 20 जून (हिं.स.) राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्यविषयक व पुनर्वसनसंदर्भातील प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्याचा निर्णय महिला व बाल विकास विभागाने घेतला आहे
एकल महिलांसाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण; सूचना आणि अभिप्रायांचे पाठविण्याचे आवाहन


नंदुरबार, 20 जून (हिं.स.) राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर, आरोग्यविषयक व

पुनर्वसनसंदर्भातील प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र व प्रभावी धोरण तयार करण्याचा

निर्णय महिला व बाल विकास विभागाने घेतला आहे. या अनुषंगाने एकल महिला धोरण अधिक व्यापक,

लोकाभिमुख व वास्तववादी करण्याच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी

संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडून

विविध मुद्द्यांवर अभिप्राय व सूचना मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल

विकास अधिकारी संजय पाटील यांनी कळविली आहे.

या मुद्द्यांवर देता येतील सूचना व अभिप्राय:

रोजगार व उपजीविका विषयक सूचना

मालमत्ता व वारसा हक्क विषयक सूचना

अपत्यांच्या शिक्षण विषयक सूचना

निवारा व पुनर्वसन विषयक सूचना

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा विषयक सूचना

नवीन योजना व उपक्रमांविषयी अपेक्षा

कायदेशीर अडचणी, पोटगी, न्यायालयीन दिरंगाई व प्रलंबित खटल्यांमध्ये सुधारणा

एकल महिलांच्या सुरक्षितते विषयी सूचना

सामाजिक सहभाग वाढविणे व रुढी-परंपरांमधील अडथळे दूर करण्यासंबंधी सूचना

अभिप्राय सादर करण्याचा नमुना: नागरिक व तज्ज्ञ व्यक्तींना वरीलपैकी ज्या क्षेत्राचे ज्ञान किंवा माहिती

असेल, त्यांनी आपले अभिप्राय देणे आवश्यक आहे. मुद्दा, सध्याची अडचण व सुचविलेली

उपाययोजना/सुधारणा. याप्रमाणे अभिप्राय देण्यात यावे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी आणि अभ्यासकांनी एकल महिलांच्या

सक्षमीकरणासाठी आपले मौल्यवान अभिप्राय व सूचना विहित मुदतीत इच्छुकांनी 22 जून 2026 रोजी

दुपारी 3.00 वाजेपर्यंत प्रत्यक्ष जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे सादर करावेत. तसेच,

wcdnandurbar@gmail.com या ईमेलवर किंवा 9421520669 या व्हॉट्सॲप (WhatsApp)

क्रमांकावरही पाठवता येतील, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande