लातूर - निराधारांचे अनुदान त्वरित खात्यावर जमा करण्याची काँग्रेसची मागणी
लातूर, 20 जून, (हिं.स.) - तीन महिन्यापासून निराधाराचे अनुदान बंद निराधारांचे अनुदान त्वरित खात्यावर जमा करण्याची काँग्रेसची मागणी राज्य व केंद्र शासनाच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी व जेष्ठ नागरिकासाठी राबविण्यात येत असलेल्या संजय गांध
निवेदन


लातूर, 20 जून, (हिं.स.) - तीन महिन्यापासून निराधाराचे अनुदान बंद निराधारांचे अनुदान त्वरित खात्यावर जमा करण्याची काँग्रेसची मागणी

राज्य व केंद्र शासनाच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी व जेष्ठ नागरिकासाठी राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजनेच्या निराधारांचे अनुदान मागील तीन महिन्यापासूनचे अन-दान त्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळे निराधारांच्या हालापेस्ट वाढलेले आहेत त्यामुळे केंद्र शासनाने व राज्य शासनाने त्वरित याची दखल घेऊन निराधारंचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार राजेश लांडगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

मागील तीन महिन्यापासून निराधार असलेल्या वयोवृद्ध परितक्ता विधवा ६५ वर्ष वरील व्यक्तींचे दर महिन्यास पंधराशे रुपये प्रमाणे मिळणारे शासकीय अनुदान मिळालेले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. लाभार्थी हे बँकेकडे चकरा व तह-सील कार्यालयाकडे सुद्धा चौकशी करत आहेत. तीन महिन्यापासून सदरील अनुदान रखडल्यामुळे व उन्हाळा पडलेला असल्यामुळे औषध गोळ्या व इतर साहित्य कशाने खरेदी करावयाचे व जगायचे कसे हा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande