रत्नागिरी : चेक बाउन्स प्रकरणी ३९.५० लाखाचा दंड
रत्नागिरी, 20 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेक बाउन्स प्रकरणामध्ये आरोपीला देवरूख न्यायालयात ३९ लाख ५० हजाराचा दंड आणि कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. देवरूख येथील वर्ग १ न्यायदंडाधिकारी यांनी एक महत्त्वपूर्ण खटल्याचा नि
रत्नागिरी : चेक बाउन्स प्रकरणी ३९.५० लाखाचा दंड


रत्नागिरी, 20 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेक बाउन्स प्रकरणामध्ये आरोपीला देवरूख न्यायालयात ३९ लाख ५० हजाराचा दंड आणि कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली.

देवरूख येथील वर्ग १ न्यायदंडाधिकारी यांनी एक महत्त्वपूर्ण खटल्याचा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना दोषी ठरविले. न्यायालयाने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देवरूख शाखेच्या बाजूने निकाल देत आरोपी श्री. साटविलकर यांना ३९ लाख ५० हजाराचा दंड आणि साध्या कैदेची शिक्षा सुनावली. आरोपीने रक्कम न भरल्यास वाढीव कैदेची शिक्षा सुनावली आहे.

जिल्हा बँकेच्या देवरूख शाखेने मुआज्जम महमद साटविलकर यांना वाहन कर्ज वितरित केलेले होते. या कर्जाच्या वसुलीपोटी श्री. साटविलकर यांनी चेक दिलेला होता. मात्र त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे चेक बाउन्स झाला होता. या अनुषंगाने बँकेने देवरूखच्या न्यायालात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टनुसार दावा दाखल केला.

या खटल्यामध्ये बँकेचे वकील अॅड. वाय. जी चंदगडकर यांनी बँकेच्या वतीने सादर केलेले दस्तऐवज व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी श्री. साटविलकर यांना शिक्षा ठोठावली.

चेकद्वारे दिलेले आश्वासन पाळणे व व्यवहारामध्ये पारदर्शकता राखणे ही कायद्याची मुख्य भूमिका आहे, असे न्यायालयाने परखड मत नोंदविले आहे. अनेक बँकांमध्ये चेक बाउन्सचे असंख्य दावे आहेत. त्यांनी हा निकाल लक्षात घ्यावा व बँकेच्या थकीत कर्जांची परतफेड करावी, असा आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande