येरवडा येथील सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
पुणे, 20 जून (हिं.स.) : राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येरवडा येथील ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह’ येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अकरावी आणि बारावीच्या विविध श
येरवडा येथील सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू


पुणे, 20 जून (हिं.स.) : राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येरवडा येथील ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह’ येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अकरावी आणि बारावीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या वसतिगृहाची एकूण क्षमता 85 विद्यार्थिनींची असून अकरावी व बारावीच्या कोणत्याही शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), तसेच दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थिनींसाठी शासनाच्या आरक्षण निकषांनुसार रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.

समाज कल्याण विभागामार्फत निवड झालेल्या विद्यार्थिनींना मोफत निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, आंथरूण-पांघरूण तसेच दरमहा 1500 रुपयांचा निर्वाह भत्ता दिला जातो. याशिवाय विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र संगणक कक्ष आणि अद्ययावत ग्रंथालयाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेऊन वेळेत प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande