फिफा विश्वचषक २०२६ मधून बाहेर पडणारा हैती पहिला संघ, ब्राझीलचा 3-0 ने विजय
फिलाडेल्फिया (अमेरिका), 20 जून (हिं.स.) ब्राझीलकडून ३-० असा मोठा पराभव पत्करल्यानंतर, २०२६ फिफा विश्वचषकातून बाहेर पडणारा हैती हा अधिकृतपणे पहिला संघ ठरला आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात हैतीचा १-० असा पराभव झाला होता आणि ब्राझीलविरुद्ध
मॅथियस कुन्हा


फिलाडेल्फिया (अमेरिका), 20 जून (हिं.स.) ब्राझीलकडून ३-० असा मोठा पराभव पत्करल्यानंतर, २०२६ फिफा विश्वचषकातून बाहेर पडणारा हैती हा अधिकृतपणे पहिला संघ ठरला आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात हैतीचा १-० असा पराभव झाला होता आणि ब्राझीलविरुद्धच्या पराभवानंतर, दोन सामन्यांतून त्यांचे गुण शून्य आहेत. त्यांचा शेवटचा सामना मोरोक्कोविरुद्ध होणार आहे. जरी त्यांनी यात अनपेक्षित विजय मिळवला, तरी ते जास्तीत जास्त ३ गुणांपर्यंतच पोहोचू शकतील. 'सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचा संघ' म्हणून पात्रता मिळवण्यासाठीही हे गुण पुरेसे ठरणार नाहीत.

या सामन्यात, ब्राझीलचा फॉरवर्ड मॅथियस कुन्हा याने प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत विश्वचषकातील आपले पहिले दोन गोल केले. पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलने हैतीवर ३-० असा सहज विजय मिळवला.विनिसियस ज्युनियरनेही पहिल्या हाफमध्ये गोल केला आणि कुन्हाच्या दोन्ही गोलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, ४० व्या मिनिटाला पायाला दुखापत झाल्यामुळे विंगर राफिन्हाला मैदान सोडावे लागले.

एकंदरीत, स्पर्धेच्या सुरुवातीला मोरोक्कोविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधणाऱ्या ब्राझील संघाकडून हा खूपच सुधारलेला खेळ पाहायला मिळाला. या निकालामुळे 'ग्रुप सी'मध्ये ब्राझीलचे चार गुण झाले असून, गोल फरकाच्या आधारे ते मोरोक्कोपेक्षा वरच्या स्थानावर पोहोचले आहेत.

मोरोक्कोने स्कॉटलंडचा १-० असा पराभव केल्यामुळे, विश्वचषकामधून बाहेर पडणारा हैती हा पहिला संघ ठरला. स्कॉटलंडच्या खात्यात तीन गुण आहेत, तर हैतीचे गुण शून्य असून ते गुणतालिकेत तळाशी आहेत. असे असले तरी, १९७४ नंतरच्या आपल्या या दुसऱ्या विश्वचषक सहभागाचा त्यांनी नक्कीच आनंद घेतला. बचावत्मक पवित्रा दर्शवणारी रचना असूनही, लाल आणि निळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या आणि उत्साहाने पाठिंबा देणाऱ्या आपल्या मोजक्या चाहत्यांसमोर त्यांनी अत्यंत प्रशंसनीय जिद्द दाखवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande