लातूरमध्ये रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
लातूर, 20 जून (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येन
आंतरराष्ट्रीय योग दिन


लातूर, 20 जून (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ अशी निश्चित करण्यात आली आहे. सकाळी 7 ते 7:45 या वेळेत जिल्ह्यात सामूहिक योग अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात विद्यार्थी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने ‘योग संगम 2026’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थांनी https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन नोंदणी करून नियम व अटी स्वीकाराव्यात, तसेच आवश्यक माहिती भरून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. कार्यक्रम स्थळाची माहिती सादर करून मिळालेला संदर्भ क्रमांक सुरक्षित ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande