आषाढी वारीसाठी उत्कृष्ट सुविधा आणि कडेकोट सुरक्षा द्या - पालकमंत्री
सोलापूर, 20 जून, (हिं.स.)। आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांना उत्कृष्ट सुविधा तसेच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.पुणे विभागीय आ
Jaykumar gore newss


सोलापूर, 20 जून, (हिं.स.)। आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांना उत्कृष्ट सुविधा तसेच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, सहआयुक्त नगरपालिका प्रशासन आशिष लोकरे, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी पालखी मार्गाची सुरक्षितता, रस्त्यांवरील अडथळे दूर करणे, रिंगण सोहळ्याची ठिकाणे, पालखी मुक्कामस्थळांची तयारी, रस्ते व पुलांची दुरुस्ती ही सर्व कामे संबंधित विभागप्रमुखांनी स्वतः लक्ष घालून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.तसेच पालखी मार्गावर उभारण्यात येणारी फिरती आणि कायमस्वरूपी शौचालये स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. तात्पुरत्या शौचालयांच्या परिसरात चिखल होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच पालखी मुक्कामस्थळांवर आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीटीकरण आणि मुरमीकरणाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande