
परभणी, 20 जून (हिं.स.)। मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या सहकार्याने तालुका विधी सेवा समिती पाथरी व वकील संघ पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने धरती जनसेवा प्रतिष्ठान संचलित धरती आयुर्वेद महाविद्यालय, पोहेटाकळी (ता. पाथरी) येथे विधी जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. एस. काझी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ विधिज्ञ तथा वकील संघाचे सदस्य बी. बी. तळेकर यांनी केले. शिबिरात विविध सामाजिक व कायदेविषयक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. वकील संघाचे अध्यक्ष टी. बी. कुलकर्णी व श्रीमती एस. पी. सूर्यवंशी यांनी जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बी. व्ही. हिवाळे यांनी अंमली पदार्थांचा दुरुपयोग व अवैध तस्करी या विषयावर माहिती दिली. एम. पी. कुलकर्णी यांनी रॅगिंग प्रतिबंधक कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. बी. गायकवाड यांनी बालकांची अनैतिक वाहतूक, बालसंरक्षण तसेच पॉक्सो कायद्याच्या विविध तरतुदींविषयी उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ. बी. डी. स्वामी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी. जे. पी. कॅम्पसचे प्रबंधक डॉ. रमेश इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी वकील संघाचे प्रतिनिधी ए. डी. चौधरी, के. आर. नाईक यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपिक मो. सलीमोद्दीन सिद्दीकी यांनी मोलाचे योगदान दिले. शिबिरास ६० महिला व ६५ पुरुष असे एकूण १२५ नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis