बीड - माजलगावात तीन कृषी केंद्राचे परवाने तात्पुरते रद्द
बीड, 20 जून, (हिं.स.)। बनावट खत विक्रीप्रकरणी माजलगाव तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने कठोर कारवाई करत खत विक्री परवाना - तात्पुरता निलंबित केले असुन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी याबाबत आदेश जारी केला. संबंधित कृषी सेवा केंद्र
बीड - माजलगावात तीन कृषी केंद्राचे परवाने तात्पुरते रद्द


बीड, 20 जून, (हिं.स.)। बनावट खत विक्रीप्रकरणी माजलगाव तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने कठोर कारवाई करत खत विक्री परवाना - तात्पुरता निलंबित केले असुन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी याबाबत आदेश जारी केला. संबंधित कृषी सेवा केंद्राविरोधात पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारी व तपासणी अहवालानुसार माजलगाव तालुक्यातील जुना मोंढा परिसरातील गणेश कृषी सेवा केंद्र, नमन अँग्रो एजन्सी, श्री दत्त कृषी सेवा केंद्र या दुकानांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत संबंधित विक्रेत्याने खत (नियंत्रण) आदेश मधील

तरतुदींचे उल्लंघन करून परवान्यातील अटी व शर्तीचा भंग केल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानातील खत विक्री व साठ्याची पडताळणी केली. त्यानंतर संबंधित विक्रेत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी ही कारवाई केली. आदेशानुसार संबंधित कृषी सेवा केंद्राचा खत विक्री परवाना २ ऑगस्ट पर्यंत निलंबित करण्यात आला आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारची खत विक्री करता येणार नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande