
नांदेड, 20 जून : नांदेड येथे खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत मोदी सरकारच्या यशस्वी 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित विशेष महा-अभियानांतर्गत अधिवक्ता बंधू-भगिनींची विशेष संवाद बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही बैठक अंत्योदय कार्यालयात घेण्यात आली.
या बैठकीत विकसित भारताच्या उभारणीत अधिवक्त्यांची भूमिका, न्यायव्यवस्थेतील योगदान तसेच नांदेड जिल्ह्यातील वकील बांधवांच्या समस्या आणि सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी विविध मुद्द्यांवर सकारात्मक विचारविनिमय केला.
कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या संकल्पनेला बळ देत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि विकास पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
वकील बांधवांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे तसेच त्यांच्या हिताच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. राष्ट्रहित, सेवा आणि लोककल्याणाला प्राधान्य देत विकसित भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis