आष्टी येथे राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
बीड, 20 जून (हिं.स.) : आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, आष्टी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 50 कर्तृत्ववान व्यक्तींचा
Q


बीड, 20 जून (हिं.स.) : आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, आष्टी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 50 कर्तृत्ववान व्यक्तींचा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

समाजाच्या विविध क्षेत्रांत निस्वार्थपणे कार्य करत आपला ठसा उमटविणाऱ्या सर्व पुरस्कारार्थींचे यावेळी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास ॲड. सुधाताई कांकरिया, नगरसेवक सुरेश बनसोडे, समाधान महाराज नाडकर, ह.भ.प. अशोक महाराज भोसले, डॉ. संदीप गाडे, ॲड. स्वातीताई जाधव, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष जावेद पठाण तसेच पत्रकार बांधव आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande