मृग नक्षत्र कोरडे; पेरण्या खोळंबल्याने चिंतेचे ढग
बीड, 20 जून, (हिं.स.)। यंदा जून महिना अर्ध्यावर आला तरी वरुणराजाने बीड जिल्ह्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. सुरुवातीला रोहिणी आणि त्यानंतर ७जून पासून सुरू झालेले मृग नक्षत्रही को र डेठाक गेल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. पावसा
मृग नक्षत्र कोरडे; पेरण्या खोळंबल्याने चिंतेचे ढग


बीड, 20 जून, (हिं.स.)। यंदा जून महिना अर्ध्यावर आला तरी वरुणराजाने बीड जिल्ह्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. सुरुवातीला रोहिणी आणि त्यानंतर ७जून पासून सुरू झालेले मृग नक्षत्रही को र डेठाक गेल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत.

अनेकांनी कर्ज काढून, उसनवारी करून महागडी बियाणे आणि खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, पावसाचा पत्ता नसल्याने ही बियाणे घरातच पडून आहेत. ज्या भागात पूर्व मोसमी किंवा किरकोळ पाऊस झाला तिथे काही शेतकऱ्यांनी घाई गडबडीत पेरण्या उरकल्या खऱ्या; पण आता कडक उन्हामुळे मोड उगवण्यापूर्वीच बियाणे कोमेजून जाण्याची भीती आहे. परिणामी, जिल्ह्यावर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पावसाकडे लागले आहे.

ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) आणि स्थानिक नद्या, नाले कोरडे पडले आहेत. उन्हाची तीव्रता कायम असल्याने पिकांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यामुळे बीडमधील ग्रामीण अर्थचक्राला मोठा ब्रेक लागला आहे.

शेतकऱ्यांनी केवळ पूर्वमोसमी किंवा किरकोळ पावसावर विसंबून राहून खरिपाची पेरणी करण्याची घाई करू नये किमान ७५ ते १०० मिलीमीटर इतका समाधानकारक पाऊस होऊन जमिनीमध्ये पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande