नाशिक - सारडा सर्कल परिसरात महापालिकेने अतिक्रमण हटविले
नाशिक, 20 जून (हिं.स.) महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने सारडा सर्कल ते चौक मंडई परीसरातील अतिक्रमणे रविवारी पहाटे धडक अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमीत दुकाने, पत्र्याचे शेड्स असे जवळपास ६० ते ६५ टपऱ्या दुकाने हटविली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्व
Municipal Corporation


नाशिक, 20 जून (हिं.स.) महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने सारडा सर्कल ते चौक मंडई परीसरातील अतिक्रमणे रविवारी पहाटे धडक अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमीत दुकाने, पत्र्याचे शेड्स असे जवळपास ६० ते ६५ टपऱ्या दुकाने हटविली.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते मोकळे करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचे आदेशाने व अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सारडा सर्कल ते चौक मंडई परिसरात ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या सह पोलीस विभागाचे अधिकारी, मनपाचे विभागीय अधिकारी व मनपा कर्मचारी यांचे उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.

मोहीम यशस्वीतेसाठी विभागीय अधिकारी हेमंत झुटे,चंदन घुगे,राहुल जाधव, नानासाहेब साळवे, राजभोज, प्रज्ञा त्रिभुवन,अभियंता संतोष जोपूळे,संजय चौधरी,विनायक जाधव, सुरेंद्र वाघ स्वप्निल भांगरे,सहाय्यक अधीक्षक संजय चौधरी, वाघ जीवन ठाकरे, अनिल लोहकरे, प्रविण बागुल, सुनिल कदम, निखील तेजाळे, नदकुमार खांडरे, व मक्तेदाराकडील ६० कर्मचारी, तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ ०१, च्या श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांचे सह वरीष्ठ पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande