नीट-युजी 2026 परीक्षा : एनटीएने जारी केला अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक
बीड, 20 जून (हिं.स.)। राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नीट-युजी पुनर्रचना परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि अफवांना आळा घालण्यासाठी आपला अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक +91 7827980287 जाहीर केला आहे. सोशल मीडियावर नीट परीक्षेबाबत प
नीट-युजी 2026 परीक्षा : एनटीएने जारी केला अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक


बीड, 20 जून (हिं.स.)।

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नीट-युजी पुनर्रचना परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि अफवांना आळा घालण्यासाठी आपला अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक +91 7827980287 जाहीर केला आहे. सोशल मीडियावर नीट परीक्षेबाबत पसरणारे बनावट मेसेज, पेपर लीकच्या खोट्या अफवा आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी एनटीएने हे पाऊल उचलले असून याद्वारे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू करण्यात आले आहे.

हे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल केवळ एकतर्फी ब्रॉडकास्ट सेवा (Broadcast Service) म्हणून काम करेल, म्हणजेच विद्यार्थ्यांना यावर परीक्षेचे वेळापत्रक, नवीन प्रवेशपत्र (Admit Card) आणि आवश्यक सूचनांचे थेट संदेश प्राप्त होतील, परंतु त्यांना यावर रिप्लाय किंवा संदेश पाठवता येणार नाही. एनटीएने स्पष्ट केले आहे की, अधिकृत अकाऊंटवर 'ब्लू व्हेरिफाइड टिक' आणि 'National Testing Agency' हे नाव असणे अनिवार्य आहे. एजन्सी कधीही व्हॉट्सॲपवर ओटीपी, वैयक्तिक माहिती किंवा बँक तपशील मागत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये आणि केवळ याच अधिकृत क्रमांकावरील माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande