सोलापूर - मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त विविध उपक्रमांची सुरुवात
सोलापूर, 20 जून, (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध जनसंपर्क उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत
gfd


सोलापूर, 20 जून, (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध जनसंपर्क उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधील अशोक चौक परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिक आस्थापना ‘विश्व लाईट हाऊस’ येथे सदिच्छा भेट देऊन देवसानी परिवाराशी संवाद साधण्यात आला.

या भेटीदरम्यान दामोदर देवसानी, गंगाधर देवसानी, अमित देवसानी, अनिल देवसानी यांच्यासह परिवारातील सदस्यांशी चर्चा करण्यात आली. सोलापुरातील ग्राहकांचा विश्वास, गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवेच्या बळावर विश्व लाईट हाऊसने स्वतंत्र ओळख निर्माण केली असून महाराष्ट्रासह देशभरातील विविध व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

प्रकाश क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि दर्जेदार सेवेमुळे या संस्थेने विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्थान मिळवले आहे. विशेषतः नवीन पिढीने डिजिटल मार्केटिंग आणि बदलत्या बाजारपेठेच्या गरजांनुसार आधुनिक व्यावसायिक पद्धतींचा स्वीकार करून व्यवसायाला नवी दिशा दिल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी नागरिक आणि व्यावसायिकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने विकास, सुशासन, आत्मनिर्भरता, राष्ट्रीय सुरक्षा, डिजिटल परिवर्तन आणि जागतिक स्तरावर वाढलेली प्रतिष्ठा यांसारख्या विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात आली. तसेच केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘संघ यात्रा’ ही पुस्तिका नागरिकांना भेट देण्यात आली. संघाचा इतिहास, विचार आणि समाजकार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande