पुणे शहर आणि जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर नीट परीक्षा; सीसीटीव्हीद्वारे नजर
पुणे, 20 जून, (हिं.स.)। पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरात चर्चेत आलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) २१ जून रोजी होणार असून, परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात कर
CP Pune


पुणे, 20 जून, (हिं.स.)। पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरात चर्चेत आलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) २१ जून रोजी होणार असून, परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुमारे २० पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील ३६ आणि पुणे शहरातील २७ अशा एकूण ६३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व केंद्रांची पाहणी संबंधित पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केली असून सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरणही केले जाणार आहे. यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना समोर आल्याने यंदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, तसेच कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून समन्वयाने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande