दक्षिण आफ्रिकेत सोलापूरच्या दोन पोलिसांनी फडकवला तिरंगा
सोलापूर, 20 जून (हिं.स.) जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा उंचावला आह
sdfg


सोलापूर, 20 जून (हिं.स.) जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा उंचावला आहे.गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे अंगरक्षक पोलीस अंमलदार हेमंत वाघमारे यांनी दक्षिण आफ्रिकेत आयोजित या जागतिक स्पर्धेत यशस्वीरीत्या शर्यत पूर्ण केली.

‘द अल्टिमेट ह्युमन रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे करण्यात आले होते. डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग या मार्गावरील ८५.७७७ किलोमीटर अंतराची ही अत्यंत खडतर चढाईची स्पर्धा मानली जाते.यंदाच्या स्पर्धेत जगभरातील २१ हजार ६७८ धावपटूंनी सहभाग घेतला होता. या आव्हानात्मक स्पर्धेत पोलीस अंमलदार हेमंत वाघमारे यांनी ९ तास २९ मिनिटांत शर्यत पूर्ण करत महाराष्ट्र पोलीस दलातून प्रथम येण्याचा मान मिळवला.तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी १० तास २३ मिनिटांत हे अंतर पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली.खराब हवामान, प्रखर उष्णता, थंडी, कठोर वेळेची मर्यादा आणि शारीरिक-मानसिक आव्हानांवर मात करत दोन्ही पोलिसांनी ही कामगिरी बजावली. या यशामुळे सोलापूर शहरासह महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande