अमरावती - मुख्याध्यापक - प्राचार्यांची शाळापूर्व तयारी सभा; नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर
अमरावती, 20 जून, (हिं.स.) आगामी शैक्षणिक सत्र यशस्वी, दर्जेदार आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याच्या उद्देशाने सिपना इंजिनिअरिंग कॉलेज येथे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका आणि प्राचार्यांची शाळापूर्व तयारी सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अ
मुख्याध्यापक-प्राचार्यांची शाळापूर्व तयारी सभा; नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर


अमरावती, 20 जून, (हिं.स.) आगामी शैक्षणिक सत्र यशस्वी, दर्जेदार आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याच्या उद्देशाने सिपना इंजिनिअरिंग कॉलेज येथे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका आणि प्राचार्यांची शाळापूर्व तयारी सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख उपस्थित होत्या.

सभेत आगामी शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेने राबविणाऱ्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे नियोजन सादर करण्यात आले. शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रदीप नानोटे यांनी शाळा प्रवेशोत्सव, स्वच्छता अभियान, इको क्लब, ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी या उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याते पवन मानकर, गजानन मानकर, उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते, इम्रान खान आणि निखिल मानकर यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले.शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सभेचा समारोप करताना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचना, जिल्ह्यात राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande