पुणे विभागात २,५७६ खत विक्री केंद्रांची तपासणी; २८१ प्रकरणांत अनियमितता उघड
पुणे, 20 जून (हिं.स.)। खतांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल २०२६ पर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खत विक्रेत्यांविरोधात कारवाई करत राज्यात १०७ खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच
NEET


पुणे, 20 जून (हिं.स.)। खतांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल २०२६ पर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खत विक्रेत्यांविरोधात कारवाई करत राज्यात १०७ खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ६ परवाने रद्द करण्यात आले असून ७ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कृषी विभागाकडून पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत एकूण २ हजार ५७६ परवानाधारक खत विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २८१ प्रकरणांमध्ये अनियमितता आणि काळाबाजाराचे प्रकार समोर आले असून २७७ केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात ६५० केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७१ प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आली असून २७ खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ केंद्रांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत १६ परवाने निलंबित, २ परवाने रद्द करण्यात आले असून ३ केंद्रांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार १२९ केंद्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ खतांचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळून आले आहेत. तसेच ६४ परवाने निलंबित, ४ परवाने रद्द करण्यात आले असून ४ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande