पुणे महापालिकेच्या सभागृहात तणाव; नगरसेवकांच्या वर्तनावर महापौर नाराज
पुणे, 20 जून (हिं.स.) : महापालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांच्या वर्तनाबाबत महापौर मंजूषा नागपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवकांचे सभागृहातील वर्तन सुधारण्यासाठी यापूर्वी दोन दिवसीय कार्यशाळा तसेच महापालिका स्तरावर आणखी एक कार्यशाळा आयोजि
Mahapoor pune


पुणे, 20 जून (हिं.स.) : महापालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांच्या वर्तनाबाबत महापौर मंजूषा नागपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवकांचे सभागृहातील वर्तन सुधारण्यासाठी यापूर्वी दोन दिवसीय कार्यशाळा तसेच महापालिका स्तरावर आणखी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अपेक्षित बदल दिसून आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक गफूर पठाण यांनी बोपोडी येथील दर्ग्यावर प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत चर्चा करण्याची परवानगी मागितली होती. यावेळी भाजपच्या काही नगरसेवकांनी त्यांच्या आसनाकडे धाव घेतल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना महापौर नागपुरे म्हणाल्या की, सभागृहात एखादा विषय मांडल्यानंतर संबंधित नगरसेवकांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संबंधितांना स्पष्ट समज देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बोपोडी येथील दर्ग्यावर कारवाईबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कारवाईपूर्वी प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र, नंतर माहिती घेतल्यानंतर संबंधितांना अतिक्रमण स्वतःहून हटविण्याची पूर्वसूचना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande