परभणीच्या पूर्णा तालुक्यात स्मशानभूमीसाठी आंदोलन
तहसील कार्यालयात आणून ठेवला मृतदेह परभणी, 20 जून (हिं.स.) : पूर्णा तालुक्यातील गौर शिवारात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने वडार समाजातील संतप्त नागरिकांनी मृत मुलीचा मृतदेह थेट पूर्णा तहसील कार्यालयात आणत प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केल
परभणीच्या पूर्णा तालुक्यात स्मशानभूमीसाठी आंदोलन


तहसील कार्यालयात आणून ठेवला मृतदेह

परभणी, 20 जून (हिं.स.) : पूर्णा तालुक्यातील गौर शिवारात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने वडार समाजातील संतप्त नागरिकांनी मृत मुलीचा मृतदेह थेट पूर्णा तहसील कार्यालयात आणत प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.

गौर शिवारातील 12 वर्षीय सरस्वती सुरेश पवार या मुलीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध नसल्याने नातेवाईक आणि समाजबांधवांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणला. अंत्यसंस्कार कुठे करायचे..? असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

या घटनेमुळे तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. समाजबांधवांनी परिसरात स्मशानभूमी नसल्याने वारंवार अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत संताप व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर समाजबांधवांनी प्रशासनाला जाब विचारत तातडीने स्मशानभूमीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande